Holi Special | ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पाना-फुलांपासून बनले ७ रंग | Sakal |

2022-03-17 97

Holi Special | ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पाना-फुलांपासून बनले ७ रंग | Sakal |


निसर्गमित्र संस्था आणि आदर्श सहेली मंचने यंदा ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पाना फुलांपासून ७ रंग बनवले आहेत. केवळ उत्पादन खर्चात हे रंग महालक्ष्मीनगरातील निसर्गमित्र संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध आहेत. झेंडू, गुलाब, शेंद्री, पळस, काटेसावर, पांगारा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, कडुलिंब, मेहंदी, नीलमोहर, बहावा, बारतोंडी, हिरडा, बेहडा डाळींब, धायटी, जांभूळ, सीताअशोक, पालक, पुदीना, बीट, टोमॅटो, गोकर्ण, शेवगा, गाजर, कडीपत्ता अशा वनस्पतींचा रंगनिर्मितीसाठी वापर केला आहे. वर्षभर हे रंग तयार करून रोजगारनिर्मितीही शक्य आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेकडून रंग घेणाऱ्या पहिल्या ७५ निसर्गप्रेमींना रंगनिर्मिती करणारे रोपटे भेट म्हणून दत्तक देण्यात येणार आहे.
कोरोनानंतर यंदाच्या होळीचा सण पारंपरिक उत्साहात होणार आहे. मात्र, रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा आग्रह धरताना कोरडे रंग खेळून पाण्याची बचत करण्याचा निर्धार ‘सकाळ'च्या सिटिझन एडिटर उपक्रमातून व्यक्त झाला. नैसर्गिक रंगांचा खाद्यपदार्थांसाठीही वापर करता येतो. त्याशिवाय केवळ रंगपंचमीपुरतेच नव्हे तर वर्षभर या रंगनिर्मितीतून महिलांना रोजगारही उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. याबाबतची जागृती अधिक व्यापकपणे करण्याचा संकल्पही यानिमित्ताने करण्यात आला.

#HoliSpecial #Holi #Flower #Colour #Marathinews #Maharashtranews